नंदादीप नेत्रालय मध्ये जागतिक महिला दिन ऐतिहासिक पद्धतीने संपन्न

नंदादीप नेत्रालय मध्ये जागतिक महिला दिन ऐतिहासिक पद्धतीने संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी: नंदादीप नेत्रालय कोल्हापूर तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दीन-दुबळ्या आणि निराधारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि विविध कार्यक्रमांचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

सर्व क्षेत्रात पुरुषा बरोबरच खांद्याला-खांदा लावून आणि साता समुद्रापलीकडे, अटकेपार झेंडा रोवण्यात ही त्या मागे नाहीत. याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी आणि आदर्श महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच एकटी व निवारा संस्थेतील आधार नसलेल्या निराधारांसाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन होते.

 यावेळी नंदादीपचे नेत्रतज्ञ डॉ. स्नेहा शिंदे , डॉ. ऋचा पाटील,प्राध्यापक सुरेश कूसाळे(ऑलम्पिक वीर व राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्नील कूसाळे यांचे वडील),महानगरपालिका समुदाय सघटक सौ. स्वाती शाह उपस्थित होत्या. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गडमुडशिंगीचे आशा वर्कर यांचा हिरकणी ग्रूप डान्स, दैवज्ञ कलामंच याचे बहारदार अशी कराओकेवरील मैफिल, नियारा फौडेशनचे अवयवदान विषयी नाटक, शिवगर्जनाचे शिवकालीन मर्दानी खेळ आणि महिलांनी संरक्षण कसे करावे यांचे IBSF संस्थेचे प्रात्यक्षिके यांनी सोहळा द्विगुणित झाला. याचबरोबर पूर्वसंध्येला जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूर तर्फे नेत्रालयाच्या सर्व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पूर्ण मार्च महिना महिलांसाठी मोफत तपासणी असल्याने त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आव्हान नंदादीप व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.