नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त्य 65 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त्य 65 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 10 जून हा  नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस, दरवर्षी एक अभिनव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होत असतो.  यावर्षी  65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर, मुंबई यासह राज्यातील अनेक ठिकाणी 65 हजार वृक्ष लागवडीचा व संगोपनाचा संकल्प करण्यात आला. नाम.चंद्रकांतदादा पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेंडा पार्क येथील ग्राउंड वर वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन दिवसांत याठिकाणी जवळपास १२५ झाडे लावण्यात आली आहेत.

यावेळी वेलफेअर, नेस्ती फौंडेशनचे अमोल बुदडे, महादेव मोर, मनीषा शिरोळीकर, अक्षय कांबळे, अमर संकपाळ यांच्यासह अनेक सहकारी, वृक्षप्रेमी नागरिकांचे सहकारी लाभले. त्याचबरोबर गुरुवर्य सुहास वायंगणकर, डॉ विदुला स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, राहूल चिकोडे, नाना कदम, राजसिंह शेळके, रुपाराणी निकम, आशीष ढवळे, अशोक देसाई, संदीप देसाई, माणिक पाटील-चुयेकर्, राजू जाधव, संग्राम निकम, संपतराव पवार उपस्थित होते.