पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी
नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी


देशात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एम. ए. मोखीम असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील एकाच्या मेलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. याबाबत या व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी बॉम्बब्लास्ट करण्याचा माझ्या हेतु असल्याचे आरोपीने म्हटले आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला ही माहिती मिळताच या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुण्यासह देशभरात