पर्यायी जागा उपलब्ध करून जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याबाबत राज्य सरकारचे पत्र

पर्यायी जागा उपलब्ध करून जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याबाबत राज्य सरकारचे पत्र
पर्यायी जागा उपलब्ध करून जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घ्या; राज्य शासनाचे कोल्हापूर महापालिकेला पत्र

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापुरातील श्री. महालक्ष्मी स्टुडिओ एल. एल. पी. फर्म यांना पर्यायी जागा उपलब्ध करून जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घ्यावी, असे पत्र राज्य शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेला पाठवले आहे. 

गेल्या काही काळापासून जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंदर्भात कोल्हापुरात वेगवेगळ्या संघटनांची आंदोलने सुरु होती. दरम्यान, महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने ३ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कोल्हापूर महानगरपालिकेला जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंदर्भात पत्र काढले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या जागेच्या मोबदल्यात श्री. महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी.फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन सदर जागा ताब्यात घ्यावी. पर्याय दोन नुसार पर्याय एक प्रमाणे कार्यवाही शक्य नसल्यास, सदर जागेतील हेरीटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी देवून विकास हस्तांतरणीय हक्क (TDR) उपलब्ध करून देण्यात यावा, असं या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.