प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी

प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी

हातकणंगले (प्रतिनिधी) :  संजय घोडावत विद्यापीठाकडून फार्मासूटिकल सायन्स मध्ये प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली.''फार्माकोलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ सिलेक्टेड इंडियन मेडिसिनल प्लांट्स फॉर हेमेटोलॉजिकल पॅरामिटर्स, ट्रान्सफेरिन लेव्हल्स अँड जनरल डेबिलिटी इन लॅबोरेटरी अनिमल्स" हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यासाठी स्कूल ऑफ फार्मासूटिकल सायन्सेस चे संचालक डॉ. सुभाष कुंभार यांनी मार्गदर्शन केले. प्रा.खोत घोडावत विद्यापीठात डी.फार्म विभागाच्या प्रमुख आहेत.

      संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, सचिव श्रेणीक घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन.के.पाटील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डीन डॉ.व्ही.व्ही कुलकर्णी, रिसर्च डीन डॉ. ए.डी सावंत,रिसर्च डिरेक्टर डॉ.संभाजी पवार,विभाग प्रमुख डॉ.जीवन लवंडे यांनी अभिनंदन केले आहे.