भोगावतीचे ते २६८३ सभासद अपात्रच,विरोधकांना दणका,निवडणुकीचा मार्ग मोकळा.
कौलव प्रतिनिधी : निवास हुजरे
भोगावती सहकारी साखर कारखाना शाहुनगर परिते ता.करवीर या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी साखर कारखान्याने प्रसिध्द केलेल्या कच्च्या मतदार यादीवर आक्षेप घेत राष्ट्रवादी, भाजप,स्वाभिमानी संघटना, शेकाप,काँग्रेस(सतेज पाटील गट) यांनी साखर सहसंचालकांकडे केलेल्या तक्रारीवर सुनावणी होऊन साखर सहसंचालकांनी ते २६८३ सभासद अपात्र ठरविल्याने विरोधकांना दणका बसला आहे. तर भोगावतीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भोगावती साखर कारखान्याने कच्ची पात्र मतदार यादी जाहीर केल्यानंतर विरोधकांनी एकत्र येत या यादीवर साखर सहसंचालकाकडे हरकत घेतली होती.संचालकमंडळाला अधिकार नसताना अपात्र केलेल्या २६८३ सभासदाना पात्र करण्याची मागणी केली होती. यावर साखर सहसंचालक श्री.गाडे यांच्यासमोर दोन दिवस सुनावणी झाली.
यामध्ये२६८३ पात्र मतदारांची नावेच यादीतुन गहाळ केल्याची तक्रार केली होती. हे सर्व सभासद कारखान्याचे कायदेशीर सभासद असून त्यांना वगळण्याची कारणे नाहीत. ते अपात्र किंवा स्वतःहून सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही ते नियमानुसार निवडणुकीचे मतदार ठरू शकतात अशी मागणी केली होती.यावर सर्वपक्षीयांच्या वतीने युक्तिवाद करताना अँड.प्रबोध पाटील,अँड नेताजी पाटील यांनी सभासद अपात्र करण्याचे अधिकार संचालक मंडळाला नसुन हे सभासद नियमानुसार अपात्र होत नसुन त्यांना पात्र ठरवावे असे सांगितले .तर कारखान्याच्यावतीने अँड.लुईस शहा यांनी संबंधित सभासदाना नोटीसा पाठवुनही आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्याने ते अपात्र ठरले असे सांगितले होते. यावर आज श्री.गाडे यांनी २६८३ सभासद अपात्रच असल्याचा निकाल देत विरोधकांचा अर्जच निकालात काढला.यामुळे विरोधकांना दणका बसला असुन भोगावतीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.