मिशन रोजगार अंतर्गत ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ उद्यापासून*

मिशन रोजगार अंतर्गत ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ उद्यापासून*

कोल्हापूर प्रतिनिधी 

तब्बल 248 कंपन्याचा सहभाग 2 हजार 500 नोकरी इच्छूकांची नोंदणी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या जॉब फेअरमध्ये 248 नामांकित कंपन्या सहभागी होणार असून 12 हजार 500नोकरी इच्छूकांनी नोंदणी केली आहे. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी ही जॉब फेअर होत आहे.  आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी युवक-युवतीना रोजगाराच्या उत्तम संधी मिळवून देण्यासाठी ‘ज्ञान आस्था फौडेशन’, ‘द डेटा टेक लॅब’ व ‘नॅस्कॉम’ यांच्या सहकार्याने ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ आयोजन केले आहे. या ‘जॉब फेअर’ साठी तेलंगणा, गुजरात, पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूरमधील अनेक नामंकित आंतरराष्ट्रीय कंपन्यासह एकूण 248 कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. आयटी, प्रोडक्शन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटीव्ह, फार्मा, हाऊसकिपींगसह विविध क्षेत्रातील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी साळोखेनगर कॅम्पस् येथे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत. यामध्ये टेक महिंद्रा, बॉश, एलटीआई- माईंड ट्री, विप्रो-पारी, टाटा इव्ही, व्यंकीज, मॅनकाईंड, सिंटेल आदी ख्यातनाम कंपनीचा सहभाग आहे.

‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ साठी पूर्वनोंदणी केलेल्या नोकरी इच्छूकांसाठी मुलाखतीचे तंत्र, आवश्यक कौशल्ये, बायोडाटा याबद्दल ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या नोकरी इच्छूकाना मुलाखतीची वेळ कळवली जाईल, त्यानुसार उपस्थित राहून नियोजनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.