HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेड प्रकरणात भाजयुमो पदाधिकारीच संशयित

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेड प्रकरणात भाजयुमो पदाधिकारीच संशयित

मुंबई - भाजप विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या अधिकृत लेटरहेडचा गैरवापर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी वळवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात प्रमुख संशयित म्हणून भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता अमित सोळुंके याचे नाव समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सायन पोलिसांच्या तपासात सोळुंके हा मुख्य संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अमित सोळुंकेने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतः ला भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चा महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून ओळख दिली आहे. त्याच्यावर रत्नागिरीमधील रस्त्याच्या कंत्राटासाठी बनावट लेटरहेड वापरल्याचा आरोप आहे. सध्या न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

बनावट कागदपत्रांद्वारे निधी वळवण्याचा प्रयत्न - 

२ जुलै रोजी दाखल एफआयआरनुसार, ३.६ कोटी रुपयांचा निधी बीड जिल्ह्यासाठी वळवण्याच्या प्रयत्नात आ. प्रसाद लाड यांच्या सही व लेटरहेडचा बनावट वापर करण्यात आला. प्रत्यक्षात २७ जून २०२५ रोजी आ. लाड यांचा नोडल जिल्हा रत्नागिरीवरून मुंबईकडे बदलण्यात आला होता, तरीही त्यांच्या नावाने जिल्हा नियोजन कार्यालयात बनावट पत्र पाठवण्यात आले.

या प्रकरणाची माहिती आमदार लाड यांचे सहाय्यक सचिन राणे यांना डीपीओ संदीप भाकरे यांनी दिली. त्यानंतर लाड यांनी त्वरित जिल्हाधिकारी व नियोजन कार्यालयाला ते पत्र रद्द करण्यास सांगितले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बनावट पत्र बीड जिल्हा नियोजन कार्यालयात प्रशांत लांडे यांनी दिले होते. त्यांनी ते पत्र निलेश वाघमोडे यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले, तर वाघमोडेंनी ते पत्र सचिन बनकर यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले. मात्र, बनकर यांनी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे तिघांचीही नावं एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आले आहे की, लांडे, वाघमोडे आणि बनकर यांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. पोलिसांचा संशय आहे की, सोळुंकेने कंत्राट मिळवून देण्याच्या बहाण्याने यांच्याकडून कमिशन घेतले.

सोळुंकेनेच बनावट कागदपत्रे तयार करून स्वतः ला आ. प्रसाद लाड असल्याचा भास देत व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन कोठडीत विचारपूस सुरू केली आहे.

सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी सोळुंकेच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, सोळुंकेनेच संपूर्ण कट रचून अन्य आरोपींशी संगनमत करून गुन्हा केला. मात्र, न्यायालयाने त्याचा पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे लक्षात घेऊन अंतरिम जामीन मंजूर केला आणि तपासात सहकार्याचे निर्देश दिले. तसेच, खटल्यादरम्यान त्याची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी काही अटी लागू केल्या जाणार आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.