HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

एकनाथ शिंदे यांच्याबाबत माजी आ. राजू पाटलांचं मोठं विधान, म्हणाले...

एकनाथ शिंदे यांच्याबाबत माजी आ. राजू पाटलांचं मोठं विधान, म्हणाले...

डोंबिवली : दोन  दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. तेथून परत येत असताना अचानक त्यांची तब्बेत बिघडली. यांनतर विश्रांतीसाठी ते आपल्या मूळ गावी दरे येथे गेले. पण इथे राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चांना उधाण आलं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानकपणे गावी जाण्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलंय. ईव्हीएमच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले. शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येतोय, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. 

पुढे राजू पाटील म्हणाले, जो निकाल लागला त्याचा मी स्वीकार केलाय. राज्यात ज्या गोष्टी घडतायत, ईव्हीएम बद्दल बोंबाबोंब चालू आहे, मनसेने २०१८ मध्ये ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली होती . यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक मला भेटतात तुम्हालाच भरभरून मतदान केलं, मात्र ते दिसत नाही असं सांगत असल्याचं राजू पाटील म्हणाले.

वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरल्याचं मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.