HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ना फडणवीस ना शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता 'या' नेत्याचे नाव चर्चेत

ना फडणवीस ना शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता 'या' नेत्याचे नाव चर्चेत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही ना काही नवीन घडामोडी  घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री पदासाठी नवनवीन नावे  पुढे येत आहेत. मराठा समीकरण लक्षात घेत त्यासंदर्भातील चाचपणी भाजप श्रेष्ठींकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत तशी खलबतं झाल्याचीही चर्चा आहे.मुख्यमंत्री पदासाठी आता ना फडणवीस ना शिंदे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे  नाव पुढे येत आहे.

सोशल मीडियावर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु आत मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची  शक्यता निर्माण झाली आहे. 

मुरलीधर मोहोळ यांचा परिचय 

मुरलीधर मोहोळ हे सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार असून त्यांच्याकडे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदार देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी कुस्तीचा एखादा गाजवत असतानाच भारतीय जनता पार्टीतून राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात खासदारकी पटकावली. भारतीय जनता पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मुरलीधर मोहोळ यांनी चार वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपदही भूषवले आहे. मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अमित शाह यांचे ते विश्वासू मानले जातात.

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून चर्चांचे खंडन 

दरम्यान, खुद्द मुरलीधर मोहोळ यांनी एक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चांचे खंडन केले आहे. या सर्व चर्चा  निरर्थक असल्याचं सांगत त्यांनी पार्लिमेंट्री बोर्डाच्या निर्णयाकडे बोट दाखवलं आहे. समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे, असे मोहोळ म्हणाले. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे स्पष्टीकरणही  मोहोळ यांनी दिले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.