HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मडिलगे परिसरात आमदार आबिटकर यांच्या पदयात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद

मडिलगे परिसरात आमदार आबिटकर यांच्या पदयात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद

गारगोटी (प्रतिनिधी) : मडिलगे बुद्रुक परिसरात काढलेल्या आमदार आबिटकर यांच्या पदयात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. गावो-गावी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले तर महिलांनी आमदार प्रकाश आबिटकरांचे औक्षण करून आम्ही ही तुमच्या पाठीशी असल्याचे दर्शविले. 

 यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, मडिलगे ही तालुक्याची उपराजधानी आहे. सुशिक्षीतांचे गाव म्हणून या गावची वेगळी ओळख आहे. या गावातील नागरीक सुजान विकासाला साथ देणारे आहेत. या गावातील मतदारांनी नेहमीच मला मोठी साथ दिली आहे. त्यामुळे यावेळी ही हा गाव माझ्या पाठीशी खंबिरपणे उभा राहील याची मला खात्री असल्याचे सांगितले. 

 यावेळी बोलताना गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे म्हणाले की, आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून गावचा भगिरथ विकास झाला आहे. त्यामुळे या गावातून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळेल. 

 यावेळी बोलताना राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्ताजीराव उगले म्हणाले, विकासाच्या माध्यमातून आमदार आबिटकर यांनी मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलला असून राज्यामध्ये या मतदार संघाची एक विकसीनशिल मतदार संघ म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ठ व अमोघ वाणीने आमदार आबिटकर यांनी राधानगरी मतदार संघाचा विधानसभेत ठसा उमटवलेला आहे.

 यावेळी काढलेल्या पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, सरपंच अनुराधा देसाई, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असो संचालक शिवाजीराव ढेंगे, डे.सरपंच सुनील बिरंबोळे, अभिजीत देसाई, रामचंद्र सुर्वे, रणजीत ढेंगे, दत्तात्रय खाडे, बाळासो खतकर यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते.

यावेळी कलनाकवाडी येथील पदयात्रेत शरदराव निंबाळकर, संजय गाडेकर, आनंदराव पेडणेकर, शिवाजीराव पोवार, अनिल वारके, बबन निकम, विक्रम पोवार, चंद्रकांत गाडेकर मनोहर दबडे, मारुती पावले, बाळासाहेब मोरस्कर, निवृत्ती वारके, सखाराम पोवार, जयसिंगराव वारके आदींसह नागरीक सहभागी झाले होते.

यावेळी खानापूर येथील पदयात्रेत भाजपाचे प्रविणसिंह सावंत, बाळासाहेब भोपळे, राजेंद्र पाटील, मानसिंग दबडे, अमर भोपळे, सरपंच शोभा गुरव, अमोल पाटील, अशोक वारके, युवराज नाईक, सुभाष गुरव, संदीप गुरव आदींसह नागरीक सहभागी झाले होते.      

यावेळी मडिलगे खुर्द येथे काढलेल्या पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, बी.एस.खापरे, के.डी.आकोळकर, आर.डी.खापरे, दिनकर कल्याणकर, आर.एस.मांडे, एन.जी.खापरे, सुखदेव खापरे, नामदेव परीट, रणजित बिरंबोळे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते.

यावेळी गंगापूर येथे काढलेल्या पदयात्रेत आबासाहेब देसाई, शामराव राजीगरे, सरपंच सिमा कांबळे, दत्तात्रय पाटील, विनायक जाधव, तानाजी जाधव, अजित जाधव, भैरु गुरव, मारुती सुतार, जनार्दन पाटील, सुरेश किल्लेदार यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थिती होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.