HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

धामणी खोऱ्यात राहुल पाटील यांचा झंझावती प्रचार दौरा

धामणी खोऱ्यात राहुल पाटील यांचा झंझावती प्रचार दौरा

सुळे( प्रतिनिधी) :  महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुल पी. पाटील यांचा धामणी खोऱ्यात झंझावती प्रचार दौरा झाला. स्व. आमदार पी.एन. पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे धामणी प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे त्यांच्या पश्चात राहुल पाटील यांच्याविषयी धामणी खोऱ्यातील ग्रामस्थांमध्ये विशेष कुतूहल आहे. प्रचार दौऱ्यात गावागावात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाजतगाजत, फटाक्यांची आतषबाजी, राहुल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत जंगी स्वागत करण्यात आले. 

 राहुल पी. पाटील यांनी प्रचारानिमित्त करवीर विधानसभा मतदारसंघातील गाव अन गाव पिंजून काढले आहे. मतदारसंघातील गावागावामध्ये संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने ते तिसऱ्यांदा भेट देत आहेत. धामणी खोऱ्यातील मोरेवाडी, मल्हारपेठ, सावर्डे, नवलेवाडी, वाघुर्डे, सुळे, कोदवडे, गोगवे, मुसलमानवाडी, वेतवडे, पणोरे, बळपवाडी, निवाचीवाडी, हरपवडे, आंबर्डे, पणुत्रे, आकुर्डे, गोठे गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून हात चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी धामणी प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा शब्द पूर्ण करणाऱ्या आम. स्व.पी.एन. पाटील यांना आम्ही विसरणार नाही. त्यांच्या माघारी राहुल पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रचार दौऱ्यात गोकुळ संचालक चेतन नरके, बाळासाहेब खाडे, राजेंद्र खानविलकर, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक, सरदार पाटील आकुर्डे, शाहू काटकर, विलास पाटील, नामदेव मोळे, शिवाजी पाटील, सुनील पाटील, सुदर्शन पाटील यांचेसह कार्यकर्ते, धामणीवाशीय सहभागी झाले होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.