मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका वर्षा राजेंद्र तेलंगे यांच्या हस्ते तीन लाखांच्या चेकचा वाटप

मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका वर्षा राजेंद्र तेलंगे यांच्या हस्ते तीन लाखांच्या चेकचा वाटप

संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील शेतकरी सुभाष राऊत व त्यांची पत्नी दोघेही शेतातून घरी येत असताना पुरात वाहात जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. सदरहू ते शेतकरी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था वरूड जहागीरचे नियमित कर्जदार होते.त्यामुळे त्यांचा अपघात विमा असल्याने त्यांचा लाभ त्यांचे परिवारातील लोकांना झाला असून त्या अपघात विम्याचा तीन लाखांचा चेक दिनांक 21/3/2023 रोजी मध्यवर्ती सहकारी बँक शाखा झाडगाव येथे जाऊन मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका सौ.वर्षा राजेंद्र तेलंगे यांच्या हस्ते राऊत परिवारातील सदस्य रविंद्र राऊत याला देण्यात आला.त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे,रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे,शाखा व्यवस्थापक नितीन वाघ,कॅशीयर रूपाली ओंकार, लिपिक अमोल बरडे, नटू सुचक तसेच मयताचे इतर वारसदार त्यांची मुलगी व जावई उपस्थित होते.