शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक,चक्काजाम ला उत्स्फूर्त प्रतिसाद ( कापसाला१० हजार रुपये भाव देण्यासह पिक विमाअनुदान तत्काळ देण्याची मागणी )
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक,चक्काजाम ला उत्स्फूर्त प्रतिसाद ( कापसाला१० हजार रुपये भाव देण्यासह पिक विमाअनुदान तत्काळ देण्याची मागणी )
यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी संजय कारवटकर
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचे नेतृत्वात मनसे द्वारे मोठे आंदोलन करण्यात आले.चक्काजाम ला चांगला प्रतिसाद मिळाला. या मुळे मनसे बाबत तालुक्यात एक चांगला संदेश गेला
शेतकऱ्याच्या कापसाला प्रति क्विंटल १०हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच अतिवृष्टीमुळे शेताचे नुकसान होवुन सुद्धा पिक विमा न मिळाल्याने पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला, कित्येक शेत खरडुनच गेले, एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा शेतकर्यांना पिक विमा मिळालाच नाही, गेले कित्येक वर्षात शेतकऱ्यांना पिक विमा मिळतच नाही तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, सरकारने जाहीर केलेली प्रोत्साहनपर ची रक्कम वंचित शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात तात्काळ जमा करावी तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नापिकी असतांना सुद्धा शेतकऱ्यांच्या कापसाला भावच मिळत नाही आहे, कापसाला १०हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा तसेच ०६/०३/२०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी राळेगाव तालुक्यातील दहेगाव,देवधरी फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले या आंदोलनाला मुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, तालुका संघटक नरेंद्र खापणे, संदिप गुरनुले,युवराज चटकी, संदिप कुटे, गणेश भोयर, गजानन बुटे, दिपक वरटकर, श्रीकांत मोहीतकर, ऊमेश पेन्दोर, प्रकाश घोटेकर, श्रीकांत मोहितकर,अविनाश डावले,हिरालाल बेलेकर, योगेश आमने, प्रदीप पानघाटे,पांडू मानवी, आकाश घोटेकर, वसंता टेकाम, राजू पानघाटे,सुमित काकडे,सुमित वाघाडे, रामाची भारसाखरे, मनोर उडवते,देविदास मोहितकर, अशोक दातारकर,नारायण हरबडे, रामाजी डाहुले, अक्षय हरबडे, दीपक खोके, नरेन्द्र धोबे,संदीप आवारी,विकास बतखल, वामन आग्रे, युवराज बल्की यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी नायब तहसिलदार दिलीप बदकी ,तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, सहाय्यक निबंधक खटाळे,मंडळ अधिकारी सानप पिक विमा कंपनी प्रतिनिधी राजने यांनी आंदोलन स्थळी भेट देवुन आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.