मनसे महायुतीत सोबत जाणार ? राहुल शेवाळे यांचं मोठं विधान

मनसे महायुतीत सोबत जाणार ? राहुल शेवाळे यांचं मोठं विधान

 लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजप, राष्ट्रवादी , काँग्रेस, शिवसेनेची ओढाताण सुरु आहे. यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. पण यावर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या भेटीमुळे मनसे महायुतीसोबत लोकसभा एकत्रित लढवणार का अशी चर्चा जोर धरत आहे. याबाबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी मोठं विधान केलं आहे. 

राहुल शेवाळे यांनी मनसे सोबतच्या युतीबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्रच युतीची घोषणा करतील अशी माहिती दिली. इतकंच नाही तर राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षांना मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज शिवजयंतीनिम्मित मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दादरमधील शिवाजी पार्क येथे एकत्र आले होते त्यावेळी ते बोलत होते.

"मनसे महायुतीत सहभागी झाली तर त्यांचे स्वागतच आहेचं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासंदर्भातील निर्णयाची घोषणा करतील. पण आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मनसेचं स्वागत करतो. राज ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही याआधीही काम केलं आहे." त्यामुळे मनसे महायुतीत आल्यास आमची ताकद वाढणारं असल्याचं त्यांनी सांगितले.