महायुतीची अजूनही अडलंय...

महायुतीची अजूनही अडलंय...

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी अद्यापही राज्यातील प्रमुख पक्षांचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी सर्वच पक्षांनी अजूनही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. येत्या काही दिवसांत जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.मात्र निवडणूक तोंडावर आली असूनही काही जागांसाठी महायुतीचा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नाहीये.

महायुतीच्या चार जागेचा तिढा अद्याप कायम आहे. रत्नागिरी, सिदुधुर्ग, धारशिव, नाशिक, पालघर या जागेवर महायुतीमध्ये अद्याप तिढा कायम आहे. रत्नागिरी सिदुधुर्ग, पालघर जागेवर भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. तर नाशिकच्या जागेवरुन शिंदे गट आणि अजित पवार गटात तिढा निर्माण झाला आहे. धारशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करण्यात येत मात्र भाजपाच्या नेत्याला राष्ट्रवादी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी मागणी केली जात आहे.