माजी सैनिकांनी 5 ऑगस्ट पर्यंत तक्रारी, अडचणी सादर करा - ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या तक्रारी, अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात माजी सैनिकांनी पाच ऑगस्टपर्यंत तक्रारी, अडचणी सादर करा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक विधवा यांनी आपल्या तक्रारी, अडचणीचे अर्ज, निवेदन 5 ऑगस्ट पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. मेळाव्याची तारीख निश्चित करुन लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी सांगितले आहे.