...म्हणून केला जन्मदात्या वडिलांचाच खून

...म्हणून केला जन्मदात्या वडिलांचाच खून
शेत जमीन आणि घरासाठी वडिलांचा खून

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

शेत जमीन आणि घर नावावर करत नसल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रदीप माने असे आरोपी मुलाचे नाव आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून प्रदीपने वडिलांकडे शेत जमीन आणि घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, प्रदीपला दारूचे व्यसन असल्याने वडील मुलाच्या नावावर घर किंवा शेत जमीन करत नव्हते. हाच रागातून प्रदीपने वडिलांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके फरशीवर आपटून ठेचले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तानाजी माने यांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रदीप मानेला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.