अनिरुद्ध आनंदोत्सव वर्धापन दिन सोहळा सांगलीमध्ये संपन्न

अनिरुद्ध आनंदोत्सव वर्धापन दिन सोहळा सांगलीमध्ये संपन्न

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

प.पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपा आशीर्वादाने सांगली येथे अनिरुद्ध आनंदोत्सव वर्धापन दिन 30 एप्रिल 2023 रोजी अत्यंत भक्तिमय चैतन्यात, महानगरपालिका शाळा नंबर सहा च्या भव्य मैदानावर संपन्न झाला. या वर्धापन सोहळ्याला संपूर्ण सांगली , सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील श्रद्धावान या सोहळ्याला उपस्थित होते.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकातून गुरुच्या म्हणजे श्री सद्गुरूच्या स्वरूपाची व महात्म्याची कल्पना येते. ही सृष्टी निर्माण करणारा व ब्रह्मदेव तिचे पालन करणारा विष्णू व सृष्टीचा संहार करणारा महादेव यांनाही ज्या देवाधि देवाने निर्माण केले आहे त्याचे स्वरूप परब्रह्मा या शब्दाने सुचित केले आहे. देवाधिदेवच स्वधर्माची शिकवण देण्यासाठी या पृथ्वीतलावरती अवतार घेत असतात त्यांचे ते दिव्य जन्म कर्म जाणणारे व त्यांच्याशी एकरूप झालेले संतही त्यांच्याबरोबर किंवा नंतर जन्म घेत असतात अर्थात देवांचे अवतार व संत हे स्वरूपात परब्रह्म असतात. माणसासारखे दिसत असले तरी ते सामान्य माणसाप्रमाणे ते मायाधीन व गुणाधीन नसतात तर ते नियंते, गुणितीत असतात, अखंड ज्ञानी व सर्वज्ञ असतात थोडक्यात देवाप्रमाणेच सद्गुरु हे परब्रह्माच्या सर्वोत्तम अशा सजीव सगुण मूर्ती स्वरूपात आपल्याजवळ आपले बापू आहेत.

श्रद्धावानाच्या हाकेला बापू साथ देतातच याचा अनुभव सांगलीमध्ये श्रद्धावानांनी एप्रिल 2013 मध्ये पुरेपूर घेतलेला होता. यावेळी श्रद्धावानांनी आपल्या लाडक्या सद्गुरूच्या प्रेम वर्षा वाचा आनंद अगदी भरभरून अनुभवलेला होता. या अनुभवानेच श्रद्धावानांचे संपूर्ण जीवनच बदलून गेलेले होते. त्या दिवसाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. याच अनुभवांचे अवचित साधून आनंदाचा जल्लोष करण्यासाठी सांगलीमध्ये रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी वर्धापन दिन भव्य दिव्य स्वरूपात सागरीमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी जवळजवळ सात ते साडेसात हजार हून अधिक श्रद्धावान या वर्धापन दिनास उपस्थित होते एप्रिल 2013 मध्ये जेव्हा पहिल्यांदा बापू सांगलीत आले होते तेव्हा सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील श्रद्धावानांच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा भाव दिसला होता तोच भाव आज आनंदोउत्सव वर्धापन दिनात सर्व श्रद्धावानाच्या चेहऱ्यावर फुलून दिसत होता.

बापूंचे खास वैशिष्ट्य म्हणजे जो श्रद्धावान सद्गुरु चरणाला घट्ट पकडून ठेवतो तोच या महामायेच्या भयानक वादळात सुरक्षित राहील याचा अनुभव आम्ही सर्व श्रद्धावानांनी कोरोना काळात घेतलेला आहे

या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व श्रद्धावानांना उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था केलेली होती. श्रद्धावान भोजन करून अनिरुद्ध आनंदोउत्सव आठवणी रूपाने पुन्हा एकदा ओला चिंब होऊन आपल्या घरी परतला.

यावेळी या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक शासकीय लोक उद्योजक माजी आमदार खासदार उपस्थित होते.

अशा रीतीने सांगली जिल्हा अनिरुद्ध फाउंडेशन च्या वतीने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.