'या' अभिनेत्याचा दोनवेळा घटस्फोट, 41 व्या वर्षी हवंय बाळ, म्हणाला ...

'या' अभिनेत्याचा दोनवेळा घटस्फोट, 41 व्या वर्षी हवंय बाळ, म्हणाला ...

मुंबई : 'बिग बॉस सीजन 18'च्या घरात सहभागी झालेला अभिनेता करणवीर मेहरा बिग बॉसच्या घरात उत्कुष्ट खेळ करताना दिसत आहे.करणचा स्वभावही दर्शकांना आवडतोय. करण नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असतो. त्याचा दोनदा घटस्फोट झालाय. करण बिग बॉस मध्ये पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटांबद्दल बोलताना दिसला. त्या दोन व्यक्तींच्या आयुष्यात मी आलो नसतो तर बरे झाले असल्याचेही त्याने म्हटले.

आता करणवीरने घरात मोठे भाष्य केले असून त्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतेय. करणवीरला बिग बॉसच्या घरातील त्याची मैत्रिण चुम दरांग हिने म्हटले की, तुला लेकरं पाहिजे आहेत? यावर करणवीर म्हणाला की, पाहिजेत यार..यावर शिल्पाने थेट म्हटले की, खूप सारे? शिल्पाचे बोलणे ऐकून मजाकमध्ये उत्तर देताना करणवीरने म्हटले, दोन तर आहेत माझ्याकडे अजून दोन झाले तर बरे होईल. पण मी जर त्यांना शाळेत सोडायला गेलो तर ते म्हणायला नको आजोबांना नका वडिलांना घेऊन या. आजोबा का आले आहेत?. हे बोलून पुढे म्हाताऱ्या व्यक्तीचा अभिनय करताना करणवीर हा दिसलाय. यावर शिल्पा म्हणाली की, यामुळेच तू लवकर करायला हवे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच मुलांचे प्लॅनिंग कर असेही शिल्पाने करणवीरला थेट म्हटले.

करणवीर 41 व्या वर्षी परत लग्न करणार ?

करणवीरचा दोनदा घटस्फोट झालाय. तो सध्या सिंगलच आहे. करवीरचे पहिले लग्न देविका मेहरा हिच्यासोबत 2009 मध्ये झाले होते. मात्र, 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करणवीरने निधि सेठ हिच्यासोबत दुसरे लग्न केले. मात्र, यांचाही घटस्फोट 2023 मध्ये झाला. आता करणवीरने थेट लेकरं पाहिजे असल्याचे म्हटले. यामुळे करणवीर हा 41 व्या वर्षी परत लग्न करणार का? याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.