HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'या' अभिनेत्रीने केलेला महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप... म्हणाली, त्यांनी माझ्यावर चप्पल फेकली

'या' अभिनेत्रीने केलेला महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप...  म्हणाली, त्यांनी माझ्यावर चप्पल फेकली

मुंबई : कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्तेपणामूळे अनेक वेळा अडचणीत आली आहे आणि तिनं लक्षही वेधलं आहे. एकदा तिने चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २०२० मध्ये कंगनाने आरोप केला होता की, 'वो लम्हे'च्या स्क्रीनिंग दरम्यान महेश भट्ट यांनी तिच्यावर चप्पल फेकली. ते तिला मारणारच होते, पण त्यांच्या मुलीने त्यांना पकडलं.

२०२० मध्ये जेव्हा अभिनेत्रीच्या टीमचा, पूजा भट्टसोबत ट्विटरवर वाद झाला. तेव्हा कंगना राणौतने हा खुलासा केला होता. पूजा भट्टने ट्विट केलं होतं की, कंगनाला महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या बॅनर स्पेशल फिल्म्सने बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटलं होतं की, ब्रेक दिल्यानं महेश भट्ट यांना तिच्यावर चप्पल फेकण्याचा अधिकार नाही.

यानंतर, कंगनाने 'रिपब्लिक टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, 'वो लम्हे'च्या स्क्रीनिंग दरम्यान महेश भट्ट यांनी तिच्यावर केवळ चप्पल फेकली नाही तर ओरडली देखील होते. कंगनाने 'धोखा' चित्रपटात काम करण्यास नकार दिला कारण त्यात तिची भूमिका एका आत्मघाती बॉम्बरची होती. कंगना राणौत म्हणाली होती, 'वयाच्या १८ व्या वर्षीही माझ्यात नाही म्हणण्याची समज होती. मी त्यांना सांगितलं की, जर एखाद्यावर अत्याचार झाला तर तो सैन्यात किंवा पोलिसात भरती होऊ शकतो, मग आत्मघातकी बॉम्बर का बनायचं? म्हणूनच मी चित्रपट करण्यास नकार दिला.'

काय म्हणाले महेश भट्ट ? 

त्याचबरोबर कंगनाने केलेल्या आरोपांवर महेश भट्ट म्हणाले होते की, 'कंगना ही एक मुलगी आहे जिने आमच्यासोबत प्रवास सुरू केला आहे. माझे संस्कार आणि मूल्य मला मुलांविरुद्ध बोलू देत नाहीत. हे माझ्या स्वभावात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्याविरुद्ध काहीही बोलणार नाही.'

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.