HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

निखिल वागळेंनी प्रियदर्शन जाधवला दिलेला मोलाचा सल्ला , म्हणाले....

निखिल वागळेंनी प्रियदर्शन जाधवला दिलेला मोलाचा सल्ला , म्हणाले....

मुंबई : अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा विविध माध्यमांतून रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने आपल्या संघर्षाचा प्रवास उलगडताना अनेक अनभिज्ञ पैलूंना वाचा फोडली आहे. एका मुलाखतीत त्याने कबूल केलं की, कधीकाळी तो एका न्यूज चॅनलमध्येही नोकरी करत होता  आणि तीही नाईलाजाने!

२००८ मध्ये वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढल्यानंतर प्रियदर्शनने एका न्यूज चॅनलमध्ये नोकरी स्वीकारली. पण इथेच त्याची भेट झाली ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याशी. त्यांनी प्रियदर्शनला थेट सांगितलं  "तू पूर्ण प्रयत्न करत नाहीयेस, आणि खरं पत्रकार व्हायला हवं त्या माणसाची जागा अडवतोयस." हे शब्द त्याच्या मनाला भिडले आणि त्याने तात्काळ पत्रकारितेची नोकरी सोडली.

५०० रुपयांपासून सुरुवात

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनने सांगितलं की, मुंबईत आल्यावर त्याने अनेक प्रकारची कामं केली असिस्टंट डायरेक्टरपासून माईम क्लासेस, जाहिरात पोहोचवण्याचं काम, अगदी रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांच्या शोपर्यंत. त्या काळात त्याचा पगार फक्त ५०० रुपये होता.

योगायोगाने मिळालेलं खरे मार्गदर्शन

प्रियदर्शन म्हणतो, “ते निर्णय आयुष्य बदलणारे ठरले. आज मी जे करतोय, ते त्या चॅनलसमोर म्हणजे माध्यमाच्या दुसऱ्या बाजूला  आत्मविश्वासाने उभं राहून करतोय.”

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.