रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास
मुंबई (वृत्तसंस्था) : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय रतन टाटा हे गेल्या काही दिवसात हॉस्पिटलला तपासणीसाठी जात होते आणि त्यांनी सांगितले होते की, त्यांची वय आणि संबंधित आरोग्य स्थिती लक्षात घेऊन त्यांची हॉस्पिटलची भेट ही नियमित वैद्यकीय तपासणीचा एक भाग आहे. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे निधन झाले आहे.