HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण करणारे अमल महाडिक - प्रा. शहाजी कांबळे

राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण करणारे अमल महाडिक - प्रा. शहाजी कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण करणारे कोल्हापूर दक्षिण मधील महायुतीचे उमेदवार अमल महाडीक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि तो आंबेडकरी चळवळीचा विजय ठरेल' असे प्रतिपादन आरपीआय राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे यांनी टाळ्याच्या गजरात केले. राममंगल कार्यालय येथे झालेल्या आरपीआय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे हे होते.

या मेळाव्यास गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक उपस्थित होत्या. या सर्वांच्या सोबत व्यासपीठावर आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापुरापासून ते कोरोना काळापर्यंतच्या विविध संकटामध्ये पदर मोड करून २४ तास मदतीस धावणारे आणि भाजप आणि खासदार फंडातून विविध गावातील मूलभूत कामे करणारे अमल महाडीक यांना येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळा समोरील बटन दाबून विजयी करावे आणि त्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी आणि अधिक गतीने आपला विकास करण्याची त्यांना संधी द्यावी असे मत त्यांनी यावेळी प्रा. शहाजी कांबळे यांनी व्यक्त केले. 

गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी यावेळी बोलताना 'समरसतेचा विचार प्रंचड विरोधावर मात करून वास्तवात आणणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणापासून ते चळवळीपर्यंत नेहमीच बहुमोलाची मदत केली आहे. या दोन्ही घराण्याचा वारसा सांगणारी मी एक प्रतिनिधी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या अधिकारातून आपण पुन्हा एकदा अमल महाडिक यांना संधी द्यावी आशी साद त्यांनी यावेळी घातली. आपल्या अध्यक्षीय समारोपात भाषणात उत्तम कांबळे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा सह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व जागा विजय होण्यासाठी निर्णायक मतदान मतदान आरपीआय एक दिलाने देणार असून सर्व उमेदवार मोठ्या सरकारने विजयी होतील व कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळी पहाट उदयास येणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

आर पी आय चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, युवा वर्ग व महिला - भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.