विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती सारथीच्या माध्यमातून तातडीने जमा करावी : विजय जाधव

विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती सारथीच्या माध्यमातून तातडीने जमा करावी : विजय जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे ही महाराष्ट्र राज्य सरकारची पहिल्यापासूनच सकारात्मक भू‌मीका आहे. सारथी या संस्थेकडून मराठा समाजातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी, परदेशातील नामांकित उच्च श्रेणीतील 200 शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. 

काल 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता, परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृती लवकरात लवकर जमा करण्यात यावी याबाबत उपमुख्यमंत्री यांना कोल्हापूर विमानतळ याठिकाणी निवेदन देण्यात आलं. 

निवेदन स्विकारल्या नंतर तात्काळ उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने सारथी संस्थेच्या वरिष्ठ अधिका-यांशी फोनद्वारे संवाद साधून यामधील पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या 02 दिवसात मंत्रालयात पोहोच करावी असे आदेश दिले. 

त्याचप्र‌माणे भाजपाच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून सारथी संस्थेच्या अधिका-यांशी बोलून याबाबत जलदगतीने कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्न चालू होते व त्याचाच परिपाक म्हाणून सारथी संस्थेची पात्र विद्यार्थीची यादी आजच पूर्ण करून मुंबई मंत्रालयात पाठवत आहे. असे सारथी संस्थेच्या अधिका-यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांना आश्वस्त के

ले.