HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आता वारं फिरलं असून 'के पीं' च्या विजयाचे साक्षीदार होवूया : धनाजीराव देसाई

आता वारं फिरलं असून 'के पीं' च्या विजयाचे साक्षीदार होवूया : धनाजीराव देसाई

कडगाव (प्रतिनिधी) : या निवडणूकीत वारं फिरल्याने माजी आमदार के पी पाटील यांना विजयी करण्याचे जनतेनेच ठरविले असून त्याचे आपण साक्षीदार होवूया,असे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांनी केले.

दरम्यान,गद्दार आमदार प्रकाश आबिटकरांना पराभूत करण्यासाठी मतदारसंघातील सच्चे शिवसैनिक झपाटून कामाला लागले असून त्यांचा पराभव करणारच असा निर्धार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला. वेसर्डेसह भुदरगडच्या पश्चिम भागातील विविध गावांच्या संपर्क दौरा व सभांमध्ये हे दोघेही बोलत होते.

धनाजीराव देसाई पुढे म्हणाले,"ही निवडणूक परिवर्तन घडविणारी असून के पी पाटील हा परिवर्तनाचा लढा यशस्वी करणारच. पश्चिम भुदरगड मधील स्वाभिमानी जनताही यासाठी एकवटली असून के पी पाटील यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी करू."

प्रकाश पाटील म्हणाले," पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिली सभा राधानगरी मतदारसंघांमध्ये घेऊन आम्हा शिवसैनिकांना प्रत्यक्ष आदेश दिल्याने यावेळी गुवाहटी रिटर्न खोके सम्राट गद्दार आमदारांना पराभवाची धूळ चारूनच मातोश्रीला के पी पाटील यांच्या विजयाची आम्ही भेट देणार आहोत."

यावेळी माजी आमदार के पी पाटील, बिद्रीचे संचालक राहुल देसाई,अनिल तळकर,बचाराम गुरव आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष निवृत्ती देसाई, विजय बुरुड यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी करडवाडी,नितवडे, नांदोली,एरंडपे,करंबळी,तिरवडे,दासेवाडी,तांबाळे आदी गावांचा प्रचारदौरा झाला. 

 *के पीं च्या विजयासाठी विश्वजीत जाधवांच्या जोडण्या* 

 के पी पाटील यांना तिन्ही तालुक्यांतून वाढता पाठिंबा मिळत असून भुदरगडचे युवा नेते विश्वजीत जाधव यांच्या माध्यमातून आजरा पंचक्रोशितील सर्जेराव देसाई,सुरेश कालेकर,नामदेव कुकट,पांडुरंग गुरव,विश्वास कोडक,शिवाजीराव देसाई, हरिभाऊ कांबळे,सुरेश पाटील, बंटी देसाई,विक्रम देसाई,प्रताप देसाई,पप्पू देसाई आदी केपींच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत. श्री जाधव यांच्या या जोडण्यांमुळे के पीं चे बळ वाढले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.