HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत जोपासू : राजेश क्षीरसागर

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत जोपासू : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १५० वी जयंती निमित्त दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, समाजातील प्रत्त्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात समता, बंधुता टिकविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. बहुजनांना शिक्षण, स्त्रीउद्धार, जातीभेदांचा नाश करण्यासाठी झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वसमावेशक विकासाचे प्रेरणास्त्रोत्र आहेत. अलौकिक प्रतिभा आणि त्यागातूनच महाराज राजर्षी झाले. आज महाराजांच्या विचाराने देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा वसा जगभरात पोहचविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुयायी होवून त्याविचारानुसार समाजकार्य करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, अमोल माने, महिला आघाडी शहरप्रमुख अमरजा पाटील, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, दीपक चव्हाण, सुरेश माने, अंकुश निपाणीकर, मंदार तपकिरे, युवासेनेचे शैलेश साळोखे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.