बकरी ईदची जय्यत तयारी

बकरी ईदची जय्यत तयारी

कोल्हापूर( प्रतिनिधी) : मुस्लिम धर्मीय बांधवांची ईदुल अजहा (बकरी ईद) सोमवारी १७ जून रोजी साजरी होत आहे. याची जय्यत तयारी सर्वत्र करण्यात आली आहे.

    कुर्बानीसाठी अनेकांनी बकरी खरेदी केली असून, घरात त्यांची देखभाल केली जात आहे. मुस्लिम बांधवांनी ईदच्या दावतची तयारी केली असून, मित्रमंडळी, पाहुण्यांना निमंत्रित केले आहे. 

   दरम्यान, सोमवारी सकाळी ६ ते ९ या वेळेत शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर पारंपरिक पद्धतीने सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ईदुल अजहा (बकरी ईद) ची नमाज होईल. मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज पठण करतील.