स्व. राजे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे हेच मोठे समाधान - सुहासिनीदेवी घाटगे

स्व. राजे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे हेच मोठे समाधान - सुहासिनीदेवी घाटगे

कागल ( प्रतिनिधी) : कारखाना सभासदांची मुले, उच्च शिक्षण घेऊन इंजिनियरिंग, मेडिकल सारख्या क्षेत्रात उच्चपदांवरती विराजमान व्हावीत हे कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे साहेब यांचे स्वप्न होते. आज कारखान्याचे शिष्यवृत्तीधारक अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ होत आहेत .स्व. राजे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे याच आम्हाला मोठे समाधान आहे असे प्रतिपादन छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

येथील शाहू साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात कारखान्याच्या भागविकास चेकवितरण अंतर्गत सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांना सन 2023-24 या वर्षाची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या,ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची भूक मोठी आहे. सभासदांच्या मुलांना , इंजिनिअरिंग ,मेडिकल सारखे उच्च शिक्षण घेता यावे यासाठी आर्थिक हातभार म्हणून अत्यंत दुरदृष्टीने स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी 1986 साली ही योजना सुरू केली.

 आज या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा झालेला आहे.या योजनेत इंजिनियरिंग (डिग्री - डिप्लोमा), कॉम्प्युटर (डिग्री - डिप्लोमा), बी .टेक. सिव्हिल, बी.एस.सी.कृषी अभियांत्रिकी पदवी, पदविका,आदी कोर्सचा या शिष्यवृती योजनेत समाविष्ट आहे. यावेळी एकूण 268 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.शाहू कारखान्याच्या या शिष्यवृत्ती योजनेचा आजमितीस 5 हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण ,संचालक सचिन मगदूम यांच्या सहसभासद,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      स्वागत प्रास्ताविक कारखान्याचे फायनान्स मॅनेजर आर.एस. पाटील यांनी केले.आभार शाहू कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी मानले.