राधानगरी येथे अज्ञात टेम्पोच्या धडकेत घोटवडे येथील एक जागीच ठार

राधानगरी येथे अज्ञात टेम्पोच्या धडकेत घोटवडे येथील एक जागीच ठार

     राधानगरी फोंडा मार्गावर अज्ञात टेम्पोनं दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बंडोपंत आनंदराव पाटील हे जागीच ठार झालेत, तर त्यांचे भाऊ विश्वास आनंदा पाटील हे गंभीर जखमी झालेत. जखमीवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आलं आहे . राधानगरी पोलीस स्टेशन नजीक हा अपघात झाला असून टेम्पो चालक टेम्पो सह पसार झाला आहे.

     घोटवडे येथील बंडोपंत पाटील आणि विश्वास पाटील हे दोघे भाऊ तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते. काम आटोपून गावी जात असताना तहसील कार्यालयापासून दोनशे मीटरवर अंतरावर अज्ञात टेम्पोनं मागून जोराची धडक दिली. यामध्ये बंडोपंत पाटील हे जागीच ठार झाले.त्यानंतर टेम्पो चालक टेम्पोसह पसार झाला. टेम्पोच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलीस तपासलं जात आहे. बंडोपत यांच्या अचानक जाण्याने घोटवडे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.