वर्धापनदिनानिमित्त RBI ने केले नवीन नाणे लॉन्च

वर्धापनदिनानिमित्त RBI ने केले नवीन नाणे लॉन्च

देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) आज ९० वर्षे पूर्ण झाली असून आज RBI चा ९० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांनी ९० रुपयांचे नाणे प्रसिद्ध केले.

 RBI च्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी RBI ची भूमिका खूप महत्वाची आहे.आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये 99.9 टक्के शुद्ध 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असे लिहिलेले आहे. तसेच, त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिले आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि नाण्याच्या वरच्या बाजूला हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या बाजूला इंग्रजीमध्ये लिहिलेले असेल. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेले आहे