शिवसमर्थ आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय-धान्य पुरवठा अधिकारी शिवाजी लांडे

शिवसमर्थ आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय-धान्य पुरवठा अधिकारी शिवाजी लांडे

कासेगाव (प्रतिनिधी) : शिवसमर्थ आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले आहेत , असे प्रतिपादन वाळवा तालुका धान्य पुरवठा अधिकारी शिवाजी लांडे यांनी केले.

   वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील शिवसमर्थ आश्रम शाळेच्या सदिच्छा भेट प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत चौधरी होते . लांडे पुढे म्हणाले , विद्यार्थी व शाळा या विकासासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी येथे सातत्याने केली जात आहे. विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिक भर दिला जात आहे . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत..याप्रसंगी स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक आरडी सातपुते यांनी केले आभार बी एन पाटील यांनी मानले या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज चौधरी , उपाध्यक्ष पृथ्वीराज चौधरी , अधीक्षक अर्जुन चौधरी सह शिक्षक - शिक्षिका विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते .