घोडावत विद्यापीठात लॉ पदवी अभ्यासक्रम सुरू
हाचकणंगले (प्रतिनिधी) : संजय घोडावत विद्यापीठात या वर्षापासून लाॅ पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे. यासाठी आवश्यक बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेचे पत्र 7 ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली.
घोडावत विद्यापीठाने बार कौन्सिलला तीन नव्या अभ्यासक्रमांच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. एल एल बी तीन वर्षे,बीए एलएलबी होनर्स व बीबीए एलएलबी होनर्स 5 वर्षे पदवी अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली.
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हे अभ्यासक्रम संजय घोडावत विद्यापीठात सुरू होत आहेत.12वी नंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये मुटकोर्ट (प्रतिरूप न्यायालय), प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम, ग्रंथालय,अभ्यासिका, पात्र शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. लॉ चे शिक्षण देणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच खाजगी विद्यापीठ म्हणून संजय घोडावत विद्यापीठ उदयास येत आहे.
या मान्यतेबद्दल चेअरमन संजय घोडावत,विश्वस्त विनायक भोसले यांनी कुलगुरू प्रो. भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,लाॅ विभागाच्या संचालक डॉ.अंजली पाटील व टीमचे अभिनंदन केले आहे.