शिवसेनेच्या आंदोलनानंतर व्हीनस कॉर्नर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

शिवसेनेच्या आंदोलनानंतर व्हीनस कॉर्नर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील राजरोसपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय विरोधात काल महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धडक कारवाई करत, व्हीनस कॉर्नर परिसर येथे धाव घेतली. आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आंदोलनाच्या दणक्याने व्हीनस कॉर्नर परिसरात उघडपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाला  आळा बसण्यास मदत झाली असून, कालच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर  आज पोलीस प्रशासनाकडून सदर भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  सदर भागातील वेश्याव्यवसायामुळे सामान्य महिलांना होणारा त्रास यामुळे थांबला असून नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.