श्री दत्त पीठ दत्तमंदिर येथे अन्नपूर्णा प्रसादालयाचे उद्घाटन
दिनेश पवार / दौंड, प्रतिनिधी
श्री दत्त पीठ दत्त मंदिरामध्ये अन्नपुर्णा प्रसादालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन अक्कलकोट अन्न छत्र मंडळचे विश्वस्त अमोल राजे भोसले, अक्कलकोट वटवृक्ष मंदीराचे अध्यक्ष महेश इंगळे, अक्ककोटचे माजी नगराध्यक्ष दिलीप शिद्धे, श्रीनाथ ट्रान्सपोर्ट प्रमूख शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी बोलताना अमोल राजे भोसले म्हणाले की, श्री दत्त श्री दत्त मंदिर हे दौंड सिद्धटेक रोडवरील लोकांसाठी एक प्रेरणा स्थान होईल आणि सावंत कुटुंबाने उभारलेल्या दत्त मंदिर व अन्नपूर्णा प्रसादालय उभारणीचे काम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. श्री दत्त महाराजांना आरस वीरभद्र ढोल ताशा पथक यांच्याकडून करण्यात आली.
शालीमार चौक भजनी मंडळाने भजन संध्या केली आणि महाप्रसाद पंगत नितीन काटे व तुषार जाधव या परिवाराकडून देण्यात आली. सागर कोल्ड्रिंक्स तर्फे आलेल्या भक्तांना सरबत वाटप करण्यात आले आलेल्या सर्व पाहुण्याचा सन्मान दत्तात्रय बुवा सावंत, ज्येष्ठ विधीतज्ञ विलास बर्वे, अरुणा डहाळे, राजेश शिंदे, सुधीर साने काका, साने काकु, अशोक गायकवाड, नितीन वाघ, कुंडलिक चुंबालकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
योवळी पोरहित्य श्रीराम जोशी गुरूजी आणि सुखटणकर यांनी केले प्रास्ताविक सुधीर साने यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप डहाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीलेश सावंत, सचिन साने, निखिल सावंत,नरेंद्र सावंत,योगेश चुंबलकर,उमेश शितोळे,नितीन राऊत यांनी परिश्रम केले.