हेतू प्रामाणिक असल्यास मदतीचा ओघ अखंड- राहूल घाटगे
सैनिक टाकळी (प्रतिनिधी) : कोणत्याही कार्यात हेतू प्रामाणिक असल्यास मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु राहतो. याची अनुभूती २०१९ च्या महापुरात गुरुदत्त कारखान्यावरील छावणी दरम्यान आली. तसाच अनुभव या शाळेबद्दल देखील येत असल्याचे मत गुरूदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी व्यक्त केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील देणगीदारांच्या सत्कार समारंभात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशश्री पॉलीचे चेअरमन टी. बी. पाटील होते.
घाटगे पुढे म्हणाले संस्थेने देणगीदारांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .त्याचा वापर योग्य प्रकारे करून आपला शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे . याच बरोबर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी विविध खेळही खेळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शाळेस सिक्युरिटी केबिन देणगी दिल्या बद्दल टी. बी. पाटील यांचा सत्कार संस्थेचे सचिव राजेश पाटील यांच्या हस्ते , खोल्यांचे सीलिंग करून दिल्या बद्दल राहुल घाटगे यांचा सत्कार संचालक पी .जी .पाटील यांच्या हस्ते तर सन १९९६-९७ दहावी मधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सर्व प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिल्या बद्दल सचिन सनदी, ,विजय पाटील,भरत पाटील,स्मिता यादव , आण्णासाहेब पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिल्याबद्दल सयाजी पाटील, शाळेच्या विकासासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस .के. पाटील , संजय पाटील ,यु.एस पाटील, माजी शिक्षक ए.ए.इंगवले, कु.एम.एम.धुमाळे , बाळासाहेब गोते, श्रीमती मालन पाटील, सुशांत पाटील, समता शिरहट्टी, प्रियांका पाटील, अमृता पाटील यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ए ए इंगवले, एम एम धुमाळे ,सचिन सनदी, शामराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, गुरुदत्त शुगर्स चे सुरक्षा अधिकारी शामराव पाटील ,ए.टी.काटकर, यांच्या सह दोन्ही शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक विनोद पाटील सुत्र संचालन उदय पाटील, यांनी तर आभार आर.एस.खोपडे यांनी मानले.