राज्य शासनाकडून अधिसूचना रद्द;राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या मागणीला यश

राज्य शासनाकडून अधिसूचना रद्द;राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या मागणीला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने,  १० ऑक्टोंबर २०२४ रोजी, अधिसूचना काढून बाजार फी १०० रूपयाच्या खरेदीवर २५ पैसे व कमाल ५० पैसे केलेली होती. यानंतर बाजार समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले होते, तर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. शासनाने अधिसूचनेत सुधारणा करून "पंचवीस पैसे व पन्नास पैसे" या मजकुरा ऐवजी पूर्वीप्रमाणेच बाजार फी दर" पंच्चाहत्तर पैसे व शंभर पैसे" असा केलेला आहे. यामुळे बाजार समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

या अधिसूचनेमुळे, राज्यातील बाजार समित्यांमध्ये कमालाची अस्वस्थता परसलेली होती. उत्पन्न निम्म्याने कमी झाले होते. पायाभूत सुविधा करिता घेतलेली कर्जे, कर्मचाऱ्यांचे पगार, विकसनशिल करता येणार नाहीत. याबाबत बाजार समित्या अवालदिल झालेल्या होत्या. बाजार समित्यांवर अचानकपणे आलेल्या या संकटात बाजार समित्यांची असलेली शिखर संस्था महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ खंबीरपणे उभा राहीली. याबाबत निर्णय घेण्यासाठी संघाचे सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील एक शिष्टमंडळ घेवून सभापती, प्रकाश देसाई (कोल्हापूर), विपक गोगड (मनमाड), विनोद चव्हाण (मालेगांव), भानुदास तिकोंडे (अकोले) अॅड. सुधिरभाऊ कोठारी (हिंगणघाट) व इतर अनेक मान्यवर सभापती तसेच संघाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी यांना घेवून दिनांक १४. ऑक्टोंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,  मंत्री छगन भुजबळ,मंत्री दादा भुसे यांच्या भेट घेवून त्यांना बाजार समित्यांची बाजू मांडली. सत्यस्थितीचे निवेदन सादर केले व बाजार समिती संधाने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेली होती. मात्र आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी शासनाने अधिसूचनेत सुधारणा करून "पंचवीस पैसे व पन्नास पैसे" या मजकुरा ऐवजी पूर्वीप्रमाणेच बाजार फी दर" पंच्चाहत्तर पैसे व शंभर पैसे" असा केलेला आहे. यामुळे बाजार समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

राज्य शासनाचे हार्दिक अभिनंदन करत राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविणकुमार नाहाटा यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ,  सार्वजनिक बांधकाम मंत्री दावा भुसे यांचे नहाटा यांनी आभार मानले.