साळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिर संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : साळोखे नगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी १०० हून अधिक बाटल्यात रक्त संकलित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, डॉ. बी. जी. कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना डॉ. अभिजीत माने म्हणाले, 'महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानामुळे आपण दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे', असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, आजकाल लोक रक्तदान करायला घाबरतात. रक्तदान केल्यावर अशक्तपणा, थकवा आणि शारीरिक वेदनांना सामोरे जावे लागते, असा गैरसमज आहे. . रक्तदानाविषयी लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी, अशा प्रकारची शिबिरे वारंवार होणे आवश्यक आहे'
यावेळी विद्यार्थी व शिक्षक, पालक तसेच कॉलेज परिसरातील लोकांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. असीम मुलाणी, डीन स्टुडन्ट वेल्फेअर प्रा. गौरव देसाई व विद्यार्थी समन्वयक यांनी केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.