श्री क्षेत्र आदमापूर येथील २० ते २८ मार्चला श्री बाळूमामा भंडारा यात्रा

कागल प्रतिनिधी : महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदगड) येथील सद्गुरू बाळूमामा यांचा भंडारा उत्सव २० ते २८ मार्च या कालावधीत होत आहे. या कालावधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री बाळूमामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी दिली.
दि. २० रोजी सायंकाळी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते विणा पूजन होणार आहे. दररोज समाधी पूजन, काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम होतील. अशोक कौलवकर, रणजित भारमल, विनय कुलकर्णी, पुंडलिक गवळी, नानासो पाटील, रामचंद्र पाटील, मृत्युंजय स्वामी यांचे प्रवचन तर नानासो पाटील, अर्जुन जाधव, विष्णू खोराटे, मारुती देवडकर, बाळकृष्ण गिरी, भानुदास कोल्हापुरे, बाळकृष्ण परीट यांचे कीर्तन होणार आहे. दि. २६ रोजी जागर, २७ रोजी पहाटे कृष्णात डोणे (वाघापूर) यांची भाकणूक, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, २८ रोजी पालखी, २८ व २९ रोजी दैनंदिन कार्यक्रम आहेत. असे कार्याध्यक्षा खडके यांनी सांगितले.