सोनतळी येथील घरफोडी प्रकरणी दोन मुली ताब्यात...पोलीसांकडून 2,05,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

सोनतळी येथील घरफोडी प्रकरणी दोन मुली ताब्यात...पोलीसांकडून 2,05,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

करवीर पोलीसठाणे गुन्हे शोध पथकाकडुन सोनतळी येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन ०२,०५,००० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलाय..काही दिवसांपूर्वी फिर्याददार रुक्साना शाहरुख झाडी, यांच्या नवीन चिखली पैकी सोनतळी येथील राहत्या घराचा दरवाजाचे कडीकोयंडा उचकटुन तिजोरीतील २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम २०,०००रुपये चोरांनी लंपास केले होते.

सदर गुन्हयाचा तपास चालु असताना घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे विक्रीकरिता वडगणे फाटा येथील यशवंत हॉटेलजवळ दोन मुली येणार आहेत अशी बातमी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी सापळा लावुन मोपेडवरुन आलेल्या स्वाती सुदर्शन कांबळे व एका अल्पवयीन मुलीला महिला पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेतलं. त्यांचा अधिक तपास केला त्यांच्या गाडीच्या डीग्गी मधील कापडी पिशवीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. याबाबत चौकशी केली असता त्यांनी सोनतळी येथील घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असल्याच त्यांनी सांगितले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आकाशदिप भोसले, जालिंदर जाधव, गुन्हे शोध पथकातील अंमलदार सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, रणजित पाटील आदींनी केली.