हणमंतवाडी येथे सोमवारी कुस्ती मैदान

करवीर : हणमंतवाडी येथील ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून नावाजलेले पैलवान संभाजी पिंजरे यांच्या अध्यक्षतेखाली चित्रोबा यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संभाजी पिंजरे यांनी दिली.
यावेळी पुरुष प्रथम क्रमांक सुरज मुंढे विरुद्ध सतपाल नागतिलक, द्वितीय तेजस मोरे विरुद्ध संकेत पाटील,महिला प्रथम अंकिता जाधव विरुद्ध प्रगती पाटील, व्दितीय क्रमांक पल्लवी जाधव विरुद्ध गायत्री ताटे यांच्यात होणार असून 70 कुस्त्या नेमलेल्या आहेत.विजेत्या पैलवान यांचा सत्कार करण्यात येणार आहे.लहान पैलवान यांच्या ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत.
यावेळी सरपंच तानाजी नरके, माजी सरपंच संजय जाधव,संग्राम भापकर, महादेव शिंदे, पोलिस पाटील रवींद्र जाधव, तंटामुक्त अध्यक्ष दिपक भापकर, नाना नरके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.