HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

‘गोकुळ’ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : चेअरमन अरुण डोंगळे

‘गोकुळ’ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : चेअरमन अरुण डोंगळे

कोल्‍हापूर  : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस निरीक्षक पदी निवड झालेबद्दल प्रशांत आनंदा इंजर रा.खोकुर्ले पैकी पडळवाडी यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, गोकुळ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादकांच्या संघाच्या विविध योजना राबवून आदर्श दूध व्यवसाय करून आपली प्रगती साधली आहे. खास करून संघाच्या वासरू संगोपन योजनेमध्ये सहभाग घेऊन जातिवंत जनावरे पैदास केली आहेत. हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. जातिवंत जनावराबरोबर दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबध्द आहे. असे  डोंगळे यांनी सांगितले. गगनबावडा तालुक्यातील पोलिस निरीक्षक म्हणून प्रशांत इंजर त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिरोळ तालुक्यातील अ.लाट येथील रावसाहेब गिरमल, आदिनाथ गिरमल, चिपरी येथील अभिजित पाटील, जैनापूर येथील शक्तीकुमार पाटील, कल्पना बिरंजे, दानोळी येथील धन्यकुमार पाराज, परशराम सावंत, दिलीप केकले, रोहित पाराज, सुकुमार पाटील तसेच उमळगाव येथील विनायक ठोंबरे व उदगाव येथील प्रशांत कोळी, प्रमोद कोळी या दूध उत्पादकांचा आदर्श दूध उत्पादक, आदर्श सचिव व आदर्श म्हैस व गाय गोठा तयार केल्याबद्दल गोकुळ संघामार्फत सत्‍कार करणेत आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.