शरद इंजिनिअरिंगमध्ये 'इम्पेटस २के२४' टेक्निकल स्पर्धा

शरद इंजिनिअरिंगमध्ये 'इम्पेटस २के२४'  टेक्निकल स्पर्धा

यड्राव (प्रतिनिधी) :   यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मंगळवार (ता.१५) ऑक्टोंबर रोजी 'इम्पेटस २०२४' या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शरद इन्स्टिट्युट व आयईईई, आयआयसी, इशरे, आय.एस.टी.ई., नवी दिल्ली अंतर्गत स्टुडंट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेन्टेशन, प्रोजेक्ट कॉम्पेटिशन, रोबो रेस यासह २४ स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह दोन लाख रूपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थीत आहेत.

पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे. टेक्नीकल पोस्टर प्रेझेंटेशन, जावा कोडींग, पिक अॅण्ड प्लेस, माइंडमेझ, इलेक्ट्रो रोडिज्, कोड स्नीपेट अशा स्पर्धा होतील. 

या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व नियोजन संयोजक प्रा.  शारदा साळुंखे यांच्यासह डॉ. के साहू, प्रा. सुजित कुंभार, प्रा. वर्षा जुजारे, प्रा. शितल घोरपडे, प्रा. चेतन पाटील, प्रा. प्रतिभा स्वामी, प्रा. अंजली झळके, प्रा. सुस्मिता पाटील, प्रा. कौसार नदाफ व विद्यार्थ्यांनी केले आहे.