हातकणंगले लोकसभा हा शिवसेनेचा गड आबांच्या रूपाने अबाधित ठेवू - मिणचेकर

  शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्याकरिता शिवसेना भवन मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए . बी. फॉर्म  हातकणंगले शिवसेना आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी हातकणंगले लोकसभा हा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे शिवसेना ठरवेल तोच खासदार या मतदार संघातून निवडून येतो. आणि तीच परंपरा कायम ठेवून सत्यजित आबांना शिवसेनेचा खासदार करून हातकणंगलेचा गड अबाधित ठेवू अशी ग्वाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, हर्षल प्रधान, जि. प. सदस्य महेश चव्हाण उपस्थित होते.