HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मामाच्या हत्येवर काय म्हणाले आमदार योगेश टिळेकर ?

मामाच्या हत्येवर काय म्हणाले आमदार योगेश टिळेकर ?

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची  भरदिवसा अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.  योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ ( वय 55) हे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असताना आरोपींनी त्यांचं अपहरण केलं. पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. काल संध्याकाळच्या सुमारास पुण्यातील निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह सापडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अपहरण स्थळापासून 40 किलोमीटर अंतरावर सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या बऱ्याच खुणा होत्या, असं पोलिसांनी सांगितलं. आता भाजप आमदार योगेश टिळेकर स्वतः त्यांच्या मामाच्या हत्येवर बोलले आहेत. 

काय म्हणाले योगेश टिळेकर ?

“काल या जागेवरून सकाळी अपहरण झालं आणि खून झाला. पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करतेय. लवकर पोलीस याचा छडा लावतील. आमच्यासाठी मोठा धक्का आहे” असं योगेश टिळेकर म्हणाले. “पोलीस आरोपीना शोधून काढतील. काही तासामध्ये सुगावा लावतील. आमदाराचा मामा असेल तरी याच राजकारण करू नये. पोलिसांवर आमची कोणतीही शंका नाही. सरकार चांगलं काम करतेय. सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झालीय” असं योगेश टिळेकर म्हणाले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.