श्री शाहू हायस्कूल, ज्यूनियर कॉलेज कागल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी* *विद्यार्थ्यानी आईवडिलाचां आदर करावा- प्राचार्य बी . के . मडिवाळ*

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनियर कॉलेज कागल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी* *विद्यार्थ्यानी आईवडिलाचां आदर करावा- प्राचार्य बी . के . मडिवाळ*

पत्रकार- सुभाष भोसले

श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज, कागल येथे गुरूपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली . प्राचार्य बी के मडिवाळ , उपप्राचार्या एस एस पाटील,उपमुख्याध्यापक टी ए पोवार, पर्यवेक्षक एम व्ही बारवडे , एस जी पाटील, एस यु देशमुख, मानसिंग निंबाळकर यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले .

या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य बी के मडिवाळ, उपप्राचार्या सौ एस एस पाटील, उपमुख्याध्यापक टी ए पोवार, पर्यवेक्षक एम व्ही बारवडे यांनी विदयार्थ्याच्या जीवनातील गुरूचे महात्म्य स्पष्ट केले .

मान्यवरांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य बी के मडिवाळ यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे महात्म्य स्पष्ट केले आई वडील हेच आपले आद्य गुरु त्यांचा आदर करा असे मार्गदर्शन केले . यावेळी कल्याणी हजारे, प्रज्ञा शिंदे , सानिका ढोबळे, महेश म्हात्रे, दिक्षा पोवार, अश्विनी शेळके, ओम पाटील, पूर्वा कांबळे यांनी गुरूविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या .व सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एल शिंदे यांनी केले . यावेळी सर्व विदयार्थ्यानीं शिक्षकांना शुभेच्छा दिल्या .