लोकराज्य जनता पार्टीच्या कोल्हापूर दक्षिण संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन.
पत्रकार- सुभाष भोसले
*कोल्हापूर*: लोकराज्य जनता पार्टीच्या कोल्हापूर दक्षिण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राजारामपुरी चौथी गल्ली येथे लोकराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले. याप्रसंगी लोकराज्य जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष पी.के. पाटील (अण्णा), कोल्हापूर दक्षिणचे अध्यक्ष महेश कांजर, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष उज्वलाताई झेंडे, शहराध्यक्ष विजय केसरकर, शहर उपाध्यक्ष वैष्णवी हांडे, जिल्हा संघटक संतोष बिसुरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष कृष्णात सातपुते, करवीर तालुका अध्यक्ष देवेंद्र पटेकरी, अनिल वरेकर, बाळकृष्ण गवळी, सर्जेराव भोसले, शशिकांत जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कांबळे, धनाजी गुरव, शाहीन बारगीर, सुधाकर डोनोलिकर,बनगे मॅडम,जितेंद्र शिंदे, विशाल चौगुले आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन अनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत महेश कांजर यांनी केले. यावेळी बोलताना लोकराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी, 'पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तारासाठी आपले योगदान द्यावे' असे आवाहन केले. आभार अमोल कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन संतोष बिसुरे यांनी केले.
लोकराज्य जनता पार्टीच्या कोल्हापूर दक्षिण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी लोकराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण, महेश कांजर, उज्वलाताई झेंडे ,विजय केसरकर,संतोष बिसुरे, कृष्णात सातपुते, देवेंद्र पटेकरी, शाहीन बारगीर, सुधाकर डोनोलीकर आदी मान्यवर.