HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Beed News : ...अन संपूर्ण कुटुंबालाच गावाने वाळीत टाकलं

Beed News : ...अन संपूर्ण कुटुंबालाच गावाने वाळीत टाकलं

बीड : मुलीचा एचआयव्हीने मृत्यू झाला होता, अशी खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली. त्यामुळे कुटुंबाची समाजात नाहक बदनामी झाली. त्यानंतर गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं, ना कोणी भेटतं, ना साधं जवळ येतं, अशी केविलवानी स्थिती पीडित कुटुंबाने सांगितली.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीडच्या आष्टी तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एचआयव्ही संसर्गाच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. आमच्यासोबत असलेले सर्व व्यवहार लोकांनी थांबवले असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ. ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यात पोलीस कर्मचारी काळे याने तुमच्या मुलीला एचआयव्ही होता, असं सांगितल्याचं ऐकू येतं. तिच्या अंत्यविधीला जे व्यक्ती जवळ होते, त्यांची तपासणी करुन घ्या अशी भीतीही दाखवली.

मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. गावाने वाळीत टाकले आहे, कोणीही जवळ येत नाही, बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे, असं बोलत आहेत, त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्या करण्यासाठी गेली होती, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं.

आमची मुलगी मरण पावली, पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाहीत. आजाराच्या अफवेने घरातील मुलं देखील जवळ येत नाहीत. फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःख आले आहे, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी महिलांनी केली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.