पुणे : महाळुंगे येथे कामगाराने केला आचाऱ्याचा खून

पुणे : महाळुंगे येथे  कामगाराने केला आचाऱ्याचा खून

पिंपरी : महाळुंगे येथील खराबवाडी परिसरातील ऐश्वर्या हॉटेलजवळ एका कामगाराने आचाऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.  ही घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या  माहितीनुसार, हॉटेलमधील आचारी आणि कामगार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर कामगाराने रागाच्या भरात चाकूने आचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून खुनामागे नेमके कारण काय आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.