रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली?; शरद कोळींची शिंदेंवर टीका

रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली?; शरद कोळींची शिंदेंवर टीका

रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली?; शरद कोळींची शिंदेंवर टीका
शरद कोळींची शिंदेंवर टीका

माझा महाराष्ट्र / वेब टीम

ठाकरे गटाचे युवा सेना विस्तारक प्रमुख शरद कोळी यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत निष्ठा यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आज कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात मशाल पेटवून या यात्रेला सुरुवात झाली. यानंतर राजारामपुरी परिसरातील लकी बाजार सूर्या हॉल येथे विस्तार प्रमुख शरद कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली? 

यावेळी शरद कोळी यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे सरकारच्या विरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे कुटुंबियांनी त्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. तरीही त्यांनी ती निष्ठा गुंडाळून ठेऊन सत्तेत आल्यानंतर ठाकरे यांच्या मालमत्तेविषयी बोलणाऱ्या रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

यासोबतच त्यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोकणातील दीडफुट्या तर वारंवार उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असतो. त्याला भाजपने यासाठीच नेमला आहे अशा शब्दात कोळी यांनी राणेंवर खोचक टीका केली. येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या आणि इतर निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जोरदार तयारी करावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, सुनील मोदी यांची भाषण झाली. यावेळी दिनेश साळवी, प्रतिज्ञा उत्तूरे, महेश उत्तूरे, अवधूत साळोखे, मंजीत माने, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, प्रियंका माने यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.